देशातील कोरोना रुग्णांची घटतेय संख्या, गेल्या 24 तासात 406 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

देशात गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामद्ये केरळमधील 11 जणांच्या मृत्यूंचा समावेश आहे. तर राजस्थानमध्ये एकाच्या मृत्युचा समावेश आहे

    नवी दिल्ली: दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. रविवारी देशात 492 नव्या कोरोना रुग्णांची (corona cases in india)  नोंद करण्यात आली होती. तर आज त्याहून कमी म्हणजेच 406 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कमी होणारी ही रुग्णसंख्य नागरिकांना दिलासा देणारी आहे. या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,41,32,433 झाली आहे.

    केंद्रीय मंत्रालयाने सकाळी 8 वाजता प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार.देशात गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामद्ये केरळमधील 11 जणांच्या मृत्यूंचा समावेश आहे. तर राजस्थानमध्ये एकाच्या मृत्युचा समावेश आहे. या 12 मृत्यूंसह मृतांची संख्या 5,30,586 वर पोहोचली आहे. मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे.तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6,402 वर गेली आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, एकूण संसर्गापैकी 0.01 टक्के सक्रीय रुग्ण आहे, म्हणजे 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये 87 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. तर राष्ट्रीय कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,32,433 वर पोहोचली आहे.

    मंत्रालयाच्या वेबसाइट दिलेल्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.86 कोटी डोस देण्यात आले आहेत.देशाने 4 मे रोजी दोन कोटी आणि गेल्या वर्षी 23 जून रोजी तीन कोटींचा टप्पा पार केला. यावर्षी 25 जानेवारी रोजी लसीकरणाचा चार कोटींचा टप्पा ओलांडला आहे.