ISRO कडून नवी माहिती समोर, चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने शोधला ऑक्सिजन आणि…

इस्रोनं संपूर्ण जगाला ही बातमी देताना सांगितलं की चांद्रयान ३ वरील प्रज्ञान रोवरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन शोध लावला आहे. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्मुनिअम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टाइटैनियम, मँगनीज, सिलिकॉन असल्याची माहिती रोवरनं इस्त्रोला दिली.

    नवी दिल्ली: भारताने २३ ऑगस्ट रोजी इतिसाह घडवला आहे. चांद्रयान-३ (Chandrayaan 3) नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर आणि दक्षिण धुव्रार भारत जगात पहिल्यांदा पोहचल्यानंतर आता ISRO नं एका आठवड्यानंतर संपूर्ण जगाला एक मोठी आनंदाची बातमी तसेच नवीन माहिती दिली आहे. काल रोव्हरच्या वाटेत खड्डा आढळला होता. मात्र आता चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने नवीन माहिती शोधली आहे. अशी ISRO कडून नवी माहिती  देण्यात आली आहे. (in front of new information from isro pragyan rover discovered oxygen and)

    काय आहे नवीन माहिती?

    दरम्यान, १४ जुलै रोजी चांद्रयान-३ चं प्रक्षेपण झालं होतं. ४० दिवसांचा प्रवास करून चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हरने बाहेर येत संशोधनाला सुरूवात केली आहे. इस्रोनं संपूर्ण जगाला ही बातमी देताना सांगितलं की चांद्रयान ३ वरील प्रज्ञान रोवरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन शोध लावला आहे. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्मुनिअम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टाइटैनियम, मँगनीज, सिलिकॉन असल्याची माहिती रोवरनं इस्त्रोला दिली. ही नवीन माहिती इस्त्रोनं जगासमोर दिली आहे. त्यामुळं चंद्रावर नवीन काय आहे, याचा शोध लागला आहे.

    चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर व ऑक्सिजन

    चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्यतिरिक्त अॅल्युमिनियम, सल्फर, कॅल्शियम, आयरन, क्रोमियम आणि टायटेनियम असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर मँगनीज आणि सिलिकॉन असल्याचंही समोर आलं आहे. दुसरीकडे, प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच पुढे जात हायड्रोजनचा शोध सुरु असल्याचं सांगितलं आहे. “चंद्रावरील संशोधन प्रगतीपथावर आहे. प्रथमच, इन-सीटू मापनांद्वारे, रोव्हरवरील ‘लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ (LIBS) या उपकरणाने दक्षिण ध्रुवावर असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर स्पष्टपणे सल्फर (एस) शोधला आहे. आता हायड्रोजनचा शोध सुरु आहे.” , असं ट्वीट इस्रोनं केलं आहे.