marriage

एक चूक भारी पडली आणि लग्न मंडपातून नवरीला घेऊन घरी निघालेला नवरदेव जेलमध्ये गेला आहे. पोलिसांनी नवरदेवाला  वऱ्हाड्यांसह थेट जेल मध्ये टाकले. झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हा प्रकार घडला आहे(In Jharkhand, a bridegroom crossing the railway line was taken to jail). 

    मंगळवारी राउरकेला येथून निघालेली लग्नाची वरात चक्रधरपूर केरा येथील रगरिंग गावात आली. चक्रधरपूरमध्ये लग्न झाल्यानंतर वधूसोबत वरात राउरकेला येथे परतणार होती. यासाठी वराकडील 22 जण पॅसेंजर ट्रेन पकडण्यासाठी जात होते. यादरम्यान त्यानी  रेल्वे ओव्हर ब्रिजचा वापर न करत  रेल्वे ट्रॅक ओलांडून फलाटाकडे जात आहे.

    रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी वधू-वरांसह २२ वऱ्हाड्यांना ताब्यात घेतले. तर वधू-वरांना आरपीएफ चौकीबाहेर बसवण्यात आले.

    रेल्वे अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच पोलिसांनी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या नवरा नवरीसह थेट वऱ्हारावरही कारवाई केली आहे.