Corona's havoc in the district! On the same day, 83 new patients, the number of active patients reached half a dozen

मागील चार दिवसात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येच घट झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, गेल्या 24 तासांत 17 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

    देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनावाढीचा (Corona Cases In India)  आलेख वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्ह वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासात 17 हजार 135 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

    तसेच बुधवारी दिवसभरात 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

    सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

    भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 3 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात 1 लाख 37 हजार 57 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.