देशात गेल्या 24 तासात 19, 406 कोरोना रुग्णांची नोंद, 49 जणांचा मृत्यू

देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट सध्या 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 19,928 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यामुळे आतापर्यंत 4,34,65,552 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

    नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 19,406 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी दिली. शुक्रवारीही देशात 19,893 कोविड-19 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

    देशातील एकूण कोरोना रुग्णांची संखऱ्या 4,41,26,994 वर गेली आहे, ज्यात 1,34,793 सक्रिय रुग्णांचा समावेश आहे. एकूण प्रकरणांपैकी ०.३१ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.

    देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट सध्या 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 19,928 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यामुळे आतापर्यंत 4,34,65,552 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. गेल्या 24 तासातील मृत्यूमुळे दिवसात 49 मृत्यूंच्या वाढीमुळे भारतातील कोविड-19 मृत्यूची संख्या 5,26,649 वर पोहोचली आहे.