देशात गेल्या 24 तासात 20,551 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 53 रुग्णांचा मृत्यू

53 नव्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंसह देशातील एकूण मृतांची संख्या 5,26,530 वर पोहोचली आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये 579 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे.

    देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासात 20,551 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोविड-१९ रुग्णांची एकूण संख्या ४,४०,८७,०३७ झाली. तर, ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 1,36,478 झाली आहेत.

    दरम्यान 53 नव्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंसह देशातील एकूण मृतांची संख्या 5,26,530 वर पोहोचली आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये 579 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. देशात एका दिवसात 20,419 जणा कोरोनातून बरे झाले आहेत. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 4,34,24,029 झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवण्यात आले आहे.कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये हा देश २४व्या क्रमांकावर आहे.