देशातून कोरोना होणार हद्दपार? एप्रिल 2020 नंतर पहिल्यादांच 215 कोरोना रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत एक मृत्यू झाला असून देशातील कोरानामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या 5,30,615 वर पोहोचली आहे.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 215 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे ही वाढ एप्रिल 2020 नंतरची सर्वात कमी रुग्णवाढ आहे. तर, सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 4980 वर आली आहे.

    देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,46,72,068 वर पोहोचली आहे.  तर  24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये 141 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. जी एकूण संसर्गाच्या 0.01%  आहे. तर,  आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत एक मृत्यू झाला असून देशातील कोरानामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या 5,30,615 वर पोहोचली आहे. तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचा  दर 98.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,36,471 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.91 कोटी डोस देण्यात आले आहेत.