धक्कादायक! जैन धर्म स्वीकारण्यासाठी सासू-सासरे टाकताहेत दबाव ;  महिलेची पोलिस ठाण्यात तक्रार

अहमदाबाद :  ‘लव्ह जिहाद’वरून सध्या देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश आणि हरयाणामध्ये गेल्या दोन दिवसात उघडीकस आलेल्या घटनांमुळे लव्ह जिहादविरोधी कायदे आवश्यक आहे की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच, एका महिलेने सासू-सासऱ्यांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. जैन धर्म स्वीकारण्यासाठी सासू-सासरे आपल्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप तिने केला आहे.

-प्रेमविवाहानंतर नवरा जर्मनीला गेला
गुजरातच्या अहमदाबादमधील प्रल्हादनगरमध्ये ही महिला राहते. एका ब्राह्मण कुटुंबात या महिलेचा जन्म झाला आहे. तक्रारदार महिलेचा प्रेमविवाह झाला आहे. जैन समाजातील मुलाबरोबर तिचे लग्न झाले. एसजी रोडवरील एका खासगी कंपनीत ती आणि तिचा प्रियकर एकत्र काम करायचे. तिथेच त्यांचे प्रेम जुळले. त्यांनी पुढे जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी 30 जानेवारीला हिंदू पद्धतीने आमचा विवाह झाला. 10 फेब्रुवारीला विवाहाची नोंदणी केली. माझ्या नवऱ्याला जर्मनीमध्ये नोकरी मिळाली. 17 फेब्रुवारीला तो तिथे शिफ्ट झाला. नवऱ्याने मला सोबत जर्मनीला नेण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याने शब्द पाळला नाही. तो मला, सॅटलाइट सिटीमध्ये सासू-सासऱ्यांकडे सोडून गेला.

-हुंड्याचीही केली मागणी
नवरा विदेशात निघून गेल्यानंतर सासू-सासऱ्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. ते वेगवेगळया प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक आहेत. जैन धर्माचा स्वीकार करण्यासाठी सासू-सासरे माझ्यावर दबाव टाकत होते, असा आरोप महिलेने केला आहे. जेव्हा मी विरोध करायचे, तेव्हा ते मला अपशब्द बोलायचे. जुलैमध्ये नवरा जर्मनीहून परत आला. त्यावेळी त्यांनी नवऱ्याचे कान भरले. त्यामुळे त्याने मला मारहाण केली असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आनंदनगर पोलिस ठाण्यात तिने एफआयआर नोंदवला आहे. सासरकडच्या मंडळींनी तिच्याकडे हुंडयाची सुद्धा मागणी केली. तिने नकार दिला, तेव्हा नवऱ्याने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले व प्रल्हादनगरमधील तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडले, असे या प्रकरणाशी संबंधित तपास अधिकाऱ्याने सांगितले.