गेल्या २४ तासात देशात 12 हजार 781 नव्या कोरोना बाधितांची नोंद!१८ रुग्णांचा मृत्यू

देशभरात रविवारी दिवसभरात 2 लाख 96 हजार 50 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत देशात एकूण 85.81 कोटीहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

    देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Patient)दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या २४ तासात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात दिल्लीसह महाराष्ट्रात रूग्णवाढ होताना दिसत आहे. दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.

    देशात मागील 24 तासांत 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी घट झाली असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 8 हजार 537 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.61 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दैनंदिन सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के इतका झाला आहे.

    दरम्यान देशभरात रविवारी दिवसभरात 2 लाख 96 हजार 50 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत देशात एकूण 85.81 कोटीहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.