Corona in Nagpur has the highest number of post-50 patients in the list of dead

आज 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 65 जणांचा मृ्त्यू झाला आहे

    देशात कोरोना रुग्णांची संख्या सध्या स्थिर असून गेल्या २४ तासात २ हजार २२६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे.
    तर मागील २४ तासात ६५ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली होती. तर २५ जणांचा मृत्यू झाला होता.

    आज आकडेवारी नुसार मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी 21 मे रोजी कोरोनाचे एकूण 2 हजार 323 नवीन रुग्ण आढळून आले होते आणि 25 जणांचा मृत्यू झाला होता. आज 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 65 जणांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, सक्रिय प्रकरणांमध्ये आता थोडीशी घट झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांवरुन आता 14 हजार 955 वर आली आहे. जी सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळपास 2 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.