देशात गेल्या 24 तासात 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 16 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. सध्या देशात 4 हजार 228 सक्रीय रुग्ण आहेत.

    नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 249 ताज्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 4,46,74,439 झाली आहे. तर, देशातील सक्रिय प्रकरणे 4244 वरून 4,228 वर आली आहेत. काल देशात 241 कोरोना रुग्ण आढळले होते.

    देशातील एकूण मृतांची संख्या 5,30,653 वर पोहोचली आहे. तर, देशातील एकूण रुग्णसंख्यापैकी ०.०१ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार राष्ट्रीय कोरोना रिकव्हरी रेट 98.80 टक्के झाला आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,39,558 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे.

    देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोविड-19 लसींचे 219.96 कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतातील कोविड-19 ची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांवर गेली होती. , 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख, 20 नोव्हेंबर रोजी 90 लाख आणि 19 डिसेंबर रोजी एक कोटींचा टप्पा ओलांडला.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या  24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 16 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. सध्या देशात 4 हजार 228 सक्रीय रुग्ण आहेत.