गेल्या 24 तासात 3 हजार 777 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 777 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या4,45,75,473 वर पोहोचली आहे. तर,  गेल्या 24 तासांत 4 हजार 255 रुग्णांनी  कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून आतापर्यंत 4,40,04,553 लाोक कोरानातुन बरे झाले आहे.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाट आकडेवारीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांची 42,358 वर पोहोचली आहे. तर, गेल्या 24 तासात 32 जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असून देशातील एकूण मृतकांचा आकडा 5,28,562 वर पोहोचला आहे. ज्यामध्ये केरळमधील 22 मृत्यूंचा समावेश आहे. देशातील एकूण संक्रमणांपैकी ०.१० टक्के सक्रिय प्रकरणं आहेत, तर कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दरम्यान, 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 1,057 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे.

    28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरला एक कोटींचा टप्पा ओलांडला. देशाने 4 मे रोजी दोन कोटींचा गंभीर टप्पा पार केला. आणि गेल्या वर्षी 23 जून रोजी तीन कोटी. यावर्षी 25 जानेवारी रोजी त्याने चार कोटींचा टप्पा ओलांडला. देशात गेल्या 24 तासांत 2,74,755 कोविड चाचण्या करण्यात आल्याअसून आतापर्यंत एकूण 89.41 कोटी चाचण्या झाल्या आहेत.