गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

सध्या देशात 43 हजार 994 सक्रिय रुग्ण आहेत असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 28 हजार 510 वर पोहोचली आहे.

    गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,45,68,114 वर पोहोचली आहे.  शुक्रवारी देशात 4 हजार 912 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

    देशात सणासुदीचे दिवस पाहत कोरोना रुग्णसंख्या वाढणार अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या  सणासुदीच्या दिवसात लोकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहयला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत  4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.  सध्या देशात 43 हजार 994 सक्रिय रुग्ण आहेत असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 28 हजार 510 वर पोहोचली आहे.