पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करणे हा भयंकर गुन्हा आहे…अशा पतीची जागा तुरुंगातच : सर्वोच्च न्यायालय

२०१९ मध्ये, हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात (In Bhiwani district of Haryana), पीडितेच्या भावाने आयपीसीच्या कलम १४८, १४९, ३२३, ३७७ आणि ३०६ अंतर्गत सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला होता.

  नवी दिल्ली : पत्नीसोबत (With Wife) जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध (Forcible Unnatural Sex) ठेवण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सोमवारी, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की, पतीने पत्नीसह जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करणे हा भयंकर गुन्हा ( heinous offence) आहे, विशेषत: जेव्हा हेच कारण पत्नीच्या आत्महत्येला (Suicide) कारणीभूत ठरले. असे म्हणत सुप्रीम कोर्टाने हुंडा छळ, घरगुती हिंसाचार आणि बलात्काराच्या आरोपाखाली दोन वर्षांहून अधिक काळ कोठडीत असलेल्या व्यक्तीला जामीन (Bail) देण्यास नकार दिला.

  २०१९ मध्ये, हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात (In Bhiwani district of Haryana), पीडितेच्या भावाने आयपीसीच्या कलम १४८, १४९, ३२३, ३७७ आणि ३०६ अंतर्गत सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला होता.

  हुंडा न मिळाल्याने केलं असं भयंकर कृत्य

  मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने पीडितेच्या पती प्रदीपला जामीन नाकारला, ज्याने तिच्या कुटुंबीयांच्या हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करून तिच्यावर अत्याचार केला.

  सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले

  सीजेआयच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने निरीक्षण केले की कलम ३७७ (बलात्कार) हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि तपास सुरू असताना आरोपी पती कोणत्याही उदारतेला पात्र नाही. पोलिस काय करत आहेत हे आम्हाला माहीत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. पती जेव्हा हुंड्याची मागणी करू लागले. तेव्हा त्याच्या पत्नीच्या कुटुंबातील सदस्य ती पूर्ण करू शकले नाहीत, तेव्हा पतीने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तिची खासगी चित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आले आणि पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वात गंभीर म्हणजे पतीचे कथितरित्या पत्नीशी अनैसर्गिक संबंध होते आणि नंतर पीडितेने आत्महत्या केली. अशा स्थितीत पती कोणत्याही प्रकारची दया करण्यास पात्र नाही कारण हा एक भयंकर गुन्हा आहे.’

  वकील म्हणाले, पतीची नोकरी जाऊ शकते …

  जेव्हा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, आरोपी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे आणि जर त्याला जामीन मिळाला नाही तर नोकरी देखील गमावली जाऊ शकते. यावर खंडपीठाने स्पष्टपणे म्हटले की, ‘हे योग्य होईल, जर अशा लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर अशा पतीची जागा तुरुंगातच असायला हवी.’