Every home flag activity to commemorate the freedom struggle! Organized between 11th to 17th August - Collector Pavneet Kaur

'हर घर तिरंगा' (Har ghar tiranga) मोहिमेमुळे देशात राष्ट्रीय सणासारखा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. भारताला ब्रिटीश (British) राजवटीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले. यामुळं आपण या दिवशी स्वांतत्र्य दिन साजरा करतो. पण जगात आणखी असे पाच देश आहेत, जे १५ ऑगस्ट रोजी 'स्वातंत्र्यदिन' साजरा करतात.

    नवी दिल्ली : आज भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली. (Independence Day) त्यामुळं देशात या वर्षा ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrit mahostav) साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण देशात मागील काही दिवसांपासून स्वातंत्र्यमय वातावरण तयार झाले आहे. सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ (Har ghar tiranga) मोहिमेमुळे देशात राष्ट्रीय सणासारखा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. भारताला ब्रिटीश (British) राजवटीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले. यामुळं आपण या दिवशी स्वांतत्र्य दिन साजरा करतो. पण जगात आणखी असे पाच देश आहेत, जे १५ ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करतात. (in world five country also celebrate Independence Day)

    भारतासह उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोने, लिकटेंस्टीन (North Korea, South Korea, Democratic Republic of Congo, Liechtenstein) हे देश सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. उत्तर कोरियाही १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. हा देशही पूर्वी जपानच्या ताब्यात होता. दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्यानंतर उत्तर कोरियाही स्वतंत्र झाले. तसेच दक्षिण कोरियाही या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यापूर्वी हा देश जपानच्या ताब्यात होता, मात्र १५ ऑगस्ट १९४५ रोजी हा देश स्वतंत्र झाला. त्यानंतर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोने १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रेंच राज्यकर्त्यांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले. जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या लिकटेंस्टीनला १८६६ मध्ये जर्मन राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळाले.