काँग्रेसच्या ‘या’ खासदाराच्या घरात आढळले कोट्यवधींचे घबाड; कपाटात तर नोटांचा अक्षरश: ढीगच

आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमध्ये बौध डिस्टलरीज प्रा.लि. मध्ये छापेमारी केली आणि कंपनीशी संबंधित परिसरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलांगीर आणि संबलपूर तसेच झारखंडमधील रांची, लोहरदगा येथे झाडाझडती घेतली.

    रांची : आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमध्ये बौध डिस्टलरीज प्रा.लि. मध्ये छापेमारी केली आणि कंपनीशी संबंधित परिसरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलांगीर आणि संबलपूर तसेच झारखंडमधील रांची, लोहरदगा येथे झाडाझडती घेतली. बुधवारी सुरू झालेली ही छापेमारी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. या संपूर्ण प्रकरणाचा आयकर विभागाची सहा पथके तपास करत आहे.

    आयकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही सामील आहेत. झारखंडमध्ये काँग्रेस नेते व राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थान व अन्य ठिकाणी आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटांनी भरलेली कपाट मिळाले जे पाहून तुम्हाला वाटेल की, हे एखाद्या बँकेचे लॉकर आहे. एकूण कितीची रोकड आहे, याची माहिती समोर आलेली नाही. नोटांची मोजदाद सुरू आहे.

    विभागाच्या सूत्रांनुसार, गुरुपारपर्यंत 50 कोटीपर्यंतच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली होती. तथापि, नोटांची संख्या इतकी आहे की, मशीन्सने काम करणेच बंद केले आहे. पश्चिम ओडिशातील सर्वात मोठी देशी मद्य निर्मिती आणि विक्रेता कंपन्यांपैकी एक असलेल्या बलदेव साहू अॅण्ड ग्रुप ऑफ कंपनीच्या बोलांगीर कार्यालयात छापेमारी दरम्यान 150 कोटींपेक्षा अधिकची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त रक्कम स्टेट बँकेच्या कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

    नोटा मोजणारी मशीन झाली खराब

    लोहरदगा येथील निवासस्थानीही आयटी टीमने कागदपत्रांची पाहणी केली. यावेळी कोणालाही आतमध्ये येण्याची परवानगी नव्हती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाची रेड सुरू होती. यावेळी पथकाने अनेक कागदपत्रांची तपासणी केली.