नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या दरात वाढ

    पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या (Gas Connection) दरात वाढ केली आहे. यापूर्वी नवे सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी नागरिकांना ७५० रुपये अधिक म्हणजेच २२०० रुपये द्यावे लागणार आहेत.

    पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रतिसिलिंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. त्याचप्रमाणे १५० रुपयांऐवजी २५० रुपये रेग्युलेटरसाठी खर्च करावे लागतील.

    इंडियन ऑइल (Indian Oil), भारत पेट्रोलियम (Bharat Petrolium) आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने (Hindustan Petrolium) दिलेल्या माहितीनुसार, पाच किलोच्या सिलिंडरची सिक्युरिटी आता ८०० ऐवजी ११५० करण्यात आली आहे. ग्राहक एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेला, तर त्यासाठी त्याला ३६९० रुपये मोजावे लागणार असून. शेगडी घ्यायची असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. एलपीजीच्या वाढत्या किमतींमध्ये कनेक्शनच्या किमतीमुळे लोक हैराण झाले आहेत.