वाढता वाढता वाढे… भारतात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांवर

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज या  रुग्णसंख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे.आज देशभरात ५६ हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने भारतातील कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे.  भारतात आता करोनाग्रस्तांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.भारतात कोरोनामुळे ४० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जगात  सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत  भारताचा क्रमांक तिसरा आहे. सध्या भारत ब्राझिलच्या खाली आहे. ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत  ५० लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या आहे. भारताच्या खालोखाल रशियाचा क्रमांक असून  रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे.