भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थिरता महत्त्वाची

भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना स्वत:च्या विकासाबरोबरच जगाची प्रगती हवी आहे. दोन्ही देशांना जगात शांतता, स्थैर्य, प्रेम हवे आहे, तर अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थतेवर मात करायची आहे, असे मोदी म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील दोन दिवसांपासून बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि बांगलादेश यांना जगात स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे. अस्थिरता आणि दहशतवादी नको, असे प्रतिपादन पीएम मोदींनी केलं आहे. पंतप्रधान मोदी मतुआ समुदायाच्या सदस्यांपुढे बोलत होते. पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी शनिवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गोपालगंज ओराकांडी येथील मंदिरात जाऊन प्रार्थना केली. मतुआ समुदायाचे आध्यात्मिक गुरू हरिचंद ठाकूर यांच्या जन्मस्थानी हे मंदिर आहे.

    भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना स्वत:च्या विकासाबरोबरच जगाची प्रगती हवी आहे. दोन्ही देशांना जगात शांतता, स्थैर्य, प्रेम हवे आहे, तर अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थतेवर मात करायची आहे, असे मोदी म्हणाले. आपण २०१५ मध्ये बांगलादेशला भेट दिली होती, तेव्हाच ओराकांडी येथे भेट देण्याची इच्छा होती, पण काही कारणास्तव ते जमले नाही. या वेळी तेथील मंदिरास भेट देऊन प्रार्थना करण्याची आपण वाटच बघत होतो, असे मोदी म्हणाले.