
नेपाळच्या आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन कामगारांसाठी भारताने यापूर्वी ‘मेड इन इंडिया’ कोरोनावरील ( India`s corona vaccine dose git to nepal)दहा दशलक्ष लसी नेपाळला भेट दिल्या आहेत.
भारताने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दोन शेजारी राष्ट्रांच्या सैन्यदलाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय लष्कराने नेपाळ लष्कराला भारत-निर्मित कोविड -१९ विरोधी लसींचेएक लाख डोस भेट म्हणून दिले आहेत.भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळ सैन्य दलाच्या सैनिकांना या लसी दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
नेपाळच्या आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन कामगारांच्या तत्काळ आवश्यकतेसाठी भारताने यापूर्वी ‘मेड इन इंडिया’ कोरोनावरील दहा दशलक्ष लसी नेपाळला भेट दिल्या आहेत. दरम्यान, चीनने सोमवारी नेपाळला ८ लाख अँटी-कोविड -१९ लसींचे दान केल्या असल्याचेही समजते.
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या वेरो सेलच्या लसी नेपाळमधील चिनी राजदूत होया यांकी यांनी आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री हृदयेश त्रिपाठी यांना या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या समारंभात दिल्या.सिनोफर्मने ही लस विकसित केली आहे.
नेपाळच्या आरोग्य व लोकसंख्या मंत्रालयाच्या अंतर्गत औषध प्रशासन विभागाने चीनमध्ये बनविलेल्या ‘वेरो सेल’ या लसीला कोव्हिड -१९ विरूद्ध आपत्कालीन वापरासाठी नेपाळमध्ये १७ फेब्रुवारी रोजी मान्यता देण्यात आली होती.
Nepal: Indian Army gifted 1 lakh doses of Made in India COVID19 vaccine to Nepal Army yesterday.#VaccineMaitri pic.twitter.com/B3Z6kyefmt
— ANI (@ANI) March 28, 2021
नेपाळने १५ मार्चपर्यंत दोन टप्प्यांत १.७ दशलक्षांहून अधिक लोकांना रोगप्रतिबंधक लस दिल्यानंतर त्यांचे लसीकरण अभियान स्थगित केले आहे. मात्र ते लवकरच पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.