लसीकरणात भारत अव्वल ! अमेरिकेलाही टाकले मागे ; आतापर्यंत ३२ कोटी ३६ लाख डोस

गेल्या आठवडाभरापासून म्हणजेच २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठीदेखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांना लस देण्यात आली.

    भारतात वेगवान लसीकरणावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे.इतकेच काय तर भारत हा सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरला असून त्याने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. गेल्या आठवडाभरापासून म्हणजेच २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठीदेखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांना लस देण्यात आली.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात २८ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.