लडाखमध्ये २६ पेट्रोलिंग पॉइंट्स भारताने गमावले; उच्चस्तरीय बैठकीत धक्कादायक दावा, काय आहे नेमक प्रकरण? वाचा…

एलएसीवर चीनने मूळ स्थिती बदलल्याचा भारताने आरोप केल्यानंतर जवळपास महिनाभराने हा अहवाल सादर करण्यात आला आहे. झटापटीच्या घटनेनंतर गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंध काहीसे ताणलेलेच राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर लडाखमधील सीमाभागात तणावाच वातावरण निर्माण झाल आहे.

  नवी दिल्ली- चीनसोबत (China) तणाव कायम असतानाच सहास्थितीवर उच्चस्तरीय बैठकीत (Meeting) झालेल्या चर्चेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बैठकीत चीनला लागून असलेल्या ६५ पैकी एकूण २६ गस्ती बिंदूवरील अर्थात पेट्रोलिंग पॉइंट्सवरील (Petroling point) तावा भारताने (India) गमावल्याचे समोर आले आहे. याबाबतचा अहवाल लडाखमधील मुख्य शहर लेहचे पोलिस अधीक्षक पी. डी. नित्या यांनी तयार केला आहे. पोलिसांच्या वार्षिक बैठकीदरम्यान हा अहवाल सादर करण्यात आला होता. एलएसीवर चीनने मूळ स्थिती बदलल्याचा भारताने आरोप केल्यानंतर जवळपास महिनाभराने हा अहवाल सादर करण्यात आला आहे. झटापटीच्या घटनेनंतर गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंध काहीसे ताणलेलेच राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर लडाखमधील सीमाभागात तणावाच वातावरण निर्माण झाल आहे.

  सुरक्षेचा आढावा…

  सीमाभागातील सुरक्षेच्या मुद्यासंदर्भातील वार्षिक उच्चस्तरीय बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये देशातील सीमाभागातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यावेळी लडाखच्या सीमाभागातील परिस्थितीचा आढावा घेणारा एक रिसर्च पेपर सादर करण्यात आला. त्यात गस्ती पॉइंटवरील ताबा गमावल्याचे म्हटले आहे.

  अघोषितबफर झोन!

  सप्टेंबर २०२१ पर्यंत काराकोरम पासपर्यंत गस्तीसाठी जाता येणे स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दलासाठी शक्य होते. मात्र, आता या भागात भारतीय लष्कराकडून चेकपोस्ट बसवण्यात आले आहेत. त्याच्यापुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे एका हे सर्व भाग भारतीय प्रशासन, नागरिक किंवा नियमित गस्त घालणाऱ्या सुरक्षा पथकासाठी अघोषित बफर झोनच ठरले आहेत.

  अहवालात काय….

  ■ जर ४०० मीटर आपण मागे हटलो तर पीएलएसोबत चार वर्षांकरिता शांतता खरेदी करता येऊ शकते आणि यात भारताचा फायदाही आहे.

  ■ या क्षेत्रात बऱ्याच काळापासून आयएसएफ अथवा भारतीय नागरिकांचा वावर नसल्याचे सांगत चीन या भागावर दावाही करू शकतो.

  ■ भारताने अशा ठिकाणी जर वफोन बनविले तर त्या भागावरील भारताचा दावाही संपुटत येतो.

  चीनची सालामी स्लायसिंग

  चीनने आतापर्यंत काबीज केलेल्या भारतीय हद्दीतील भूभागाप्रमाणेच या गस्तिविदूवरही चीन आपला ताबा मिळवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही काळानंतर चीन असा दावा क शकतो की या भागांमध्ये भारतीय लष्कराचा दि सुरक्षा दलाचा वावर नाही. त्यामुळे हा भूभाग आमचा आहे, असेही महटले जात आहे. थोडा-थोडा भूभाग अंकित करण्याच्या चीनच्या धोरणालाच सालामी स्लायसिंग म्हटले जाते.

  गस्तच घातली नाही

  सद्यस्थितीत लडाखमध्ये काराकोरमपासपासून मूरपर्यंत ६५ गस्ती पॉइंट्स आहेत. यापैकी २६ पॉइंट्स भारताने गमावले आहेत. भारताने ताबा गमावलेल्या २६ गस्ती चीन आणि भारतीय सैदिमध्ये पीपी क्रमांक ५ ते १७ २४३२३७. ५१.५२ व ६२ या ठिकरणांचा समावेश आहे.