सीमेजवळ मुस्लिम लोकसंख्येत ३२ टक्के वाढ; बीएसएफची रेंज १०० किमीपर्यंत वाढवणार

ग्रामपंचायतींच्या ताज्या नोंदींच्या आधारे यूपी आणि आसामच्या पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला स्वतंत्र अहवाल पाठवला आहे. दोन्ही अहवालांनुसार २०११ पासून सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये ३२% वाढ झाली आहे. तर देशभरात १०% आणि १५%च्या दरम्यान बदल झाला आहे. म्हणजेच मुस्लिम लोकसंख्या सर्वसाधारण लोकसंख्येपेक्षा २०% अधिक वाढली आहे. सुरक्षा संस्था आणि राज्य पोलिसांनी हा बदल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला आहे.

    नवी दिल्ली – उत्तर प्रदेश आणि आसाममधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मागील १० वर्षांत अनपेक्षित लोकसंख्याशास्त्रीय (डेमोग्राफिक) बदल झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या ताज्या नोंदींच्या आधारे यूपी आणि आसामच्या पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला स्वतंत्र अहवाल पाठवला आहे. दोन्ही अहवालांनुसार २०११ पासून सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये ३२% वाढ झाली आहे. तर देशभरात १०% आणि १५%च्या दरम्यान बदल झाला आहे. म्हणजेच मुस्लिम लोकसंख्या सर्वसाधारण लोकसंख्येपेक्षा २०% अधिक वाढली आहे. सुरक्षा संस्था आणि राज्य पोलिसांनी हा बदल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी बीएसएफच्या अधिकारक्षेत्राची रेंज ५० किमीवरून १०० किमीपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच सीमेच्या मागे १०० किमीपर्यंत तपास आणि शोध घेण्याचे अधिकार बीएसएफला असतील.

    केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एवढा मोठा लोकसंख्येतील बदल हा केवळ लोकसंख्या वाढीचा मुद्दा नाही. भारतातील घुसखोरीची ही नवी रचना असू शकते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे भान ठेवून आतापासूनच जोरदार तयारी करावी लागणार आहे. कदाचित त्यामुळेच यूपी आणि आसामच्या सुरक्षा यंत्रणांनी बीएसएफची व्याप्ती वाढवण्याची शिफारस केली आहे.

    गुजरात वगळून इतर सीमावर्ती राज्य पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश आणि पूर्व व उत्तर राज्यांमधील बीएसएफचे अधिकार क्षेत्र १५ किमीपर्यंत मर्यादित केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये तपासणी केल्यानंतर ते क्षेत्र ५० किमीपर्यंत वाढवले आहे. काही राज्यांनी यावर आ‍क्षेपही घेतला होता.