देशात गेल्या 24 तासात १५ हजार 815 कोरोना रुग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (13 ऑगस्ट) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,35,93,112 वर पोहोचली आहे.

    देशात गेल्या काही दिवसापासून वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहत सध्या काहीशी दिलासा देणारी बातमी समोर ये आहे. देशात गेल्या 24 तासात 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची (India Corona Update) नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या 24 तासात 20 हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त झाले. सध्या देशातील कोरोना रिकव्हरी रेट 98.3 टक्क्यांवर गेलाय.

    देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत गेल्या 24 तासांत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत शुक्रवारी 746 रुग्णांची घट झाली आहे. तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत 20 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (13 ऑगस्ट) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,35,93,112 वर पोहोचली आहे. तर, भारतातील कोविड-19 ची एकूण सक्रिय प्रकरणे 1,19,264 पर्यंत कमी झाली आहेत.