देशात गेल्या 24 तासात 16 हजार 561 कोरोना रुग्णांची नोंद, 49 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत कोविडमुळे 49 नवीन मृत्यूंसह, आतापर्यंत देशात एकूण 5,26,928 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,23,535 वर गेली आहे

    देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या (Corona Cases In India ) 16,561 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 49 जणांाच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (12 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, देशाती एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 4,35,73,094 वर पोहोचला आहे.

    तर, गेल्या 24 तासांत कोविडमुळे 49 नवीन मृत्यूंसह, आतापर्यंत देशात एकूण 5,26,928 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,23,535 वर गेली आहे. तर कोरना रुग्णांचा बरे होण्याचा दर ९८.५ टक्के आहे. गेल्या 24 तासात कोरोनाव्हायरस संसर्गातून तब्बल 18,053 बरे झाले असून देशातील एकूण 4,35,73,094 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 24 तासांच्या या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 1,541 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. एकूण संसर्गांपैकी ०.२८ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.