देशात गेल्या 24 तासात 5 हजार 383 रुग्णांची नोंद

देशात सध्या 45 हजार 281 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. काल देशात 46 हजार 342 उपचाराधीन कोरोना रुग्ण होते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

    सणासुदीच्या काळात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर येत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 5 हजार 383 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

    गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत चढउतार पाहायला मिळत होता. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 383 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर गुरुवारी दिवसभरात 20 कोरोना रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तसेच, देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी दिवसभरात 6 हजार 424 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के आहे. देशात सध्या 45 हजार 281 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. काल देशात 46 हजार 342 उपचाराधीन कोरोना रुग्ण होते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.