India, the world's first continent to emerge from the sea! The site, which is 200 million years older than Africa and Australia, was discovered after seven years of exploration

जगातला कोणता भूखंड समुद्तून पहिल्यांदा बाहेर आला. या प्रश्नाचे उत्तर गेले कित्येक वर्षे शोधण्यात येत आहे. आत्तापर्यंत हेच मानण्यात येत होते की अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सर्वात पहिल्यांदा समुद्रातून बाहेर आले होते. मात्र आता नव्या शोधाने हा समज खोटा ठरवला आहे. झारखंड राज्यातील सिंहभूम हा जिल्हा समुद्रातून बाहेर पडलेला पहिला भूखंड, महाद्विप असल्याचा शोध वैज्ञानिकांनी सात वर्षांच्या अथक शोधानंतर लावला आहे. यात तीन देशांच्या सात संशोधकांचा समावेश आहे(India, the world's first continent to emerge from the sea! The site, which is 200 million years older than Africa and Australia, was discovered after seven years of exploration).

    नवी दिल्ली : जगातला कोणता भूखंड समुद्तून पहिल्यांदा बाहेर आला. या प्रश्नाचे उत्तर गेले कित्येक वर्षे शोधण्यात येत आहे. आत्तापर्यंत हेच मानण्यात येत होते की अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सर्वात पहिल्यांदा समुद्रातून बाहेर आले होते. मात्र आता नव्या शोधाने हा समज खोटा ठरवला आहे. झारखंड राज्यातील सिंहभूम हा जिल्हा समुद्रातून बाहेर पडलेला पहिला भूखंड, महाद्विप असल्याचा शोध वैज्ञानिकांनी सात वर्षांच्या अथक शोधानंतर लावला आहे. यात तीन देशांच्या सात संशोधकांचा समावेश आहे(India, the world’s first continent to emerge from the sea! The site, which is 200 million years older than Africa and Australia, was discovered after seven years of exploration).

    कसा लागला हा शोध

    आपले सैरमंडळ, पृथ्वी किंवा दुसरे ग्रह कसे तयार झाले, याचा शोध हे संशोधक घेत होते. त्यात ४ भारतीयांचा समावेश होता. या शोधासाठी या सात संशोधकांनी सात वर्षे झारखंडच्या कोल्हान आणि ओडिशाच्या क्योझरपासून अनेक जिल्ह्यांतील डोंगर, पर्वतांवर प्रवास केला. हा सगळा परिसरा नक्षलग्रस्त अशी ओळख असूनही, यातही जणांनी या संशोधनात माघार घेतली नाही.

    या सहा-सात वर्षांच्या काळात फिल्ड वर्कमध्ये सुमारे ३०० ते ४०० दगडांचे नमुने प्रयोगशाळेत तापसण्यात आले. यात काही बलुआ नावाचे दगडे होते तर काही ग्रेनाईट होते. जे बलुआ दगड शोधण्यात आले होते, त्यांची निर्मिती नदी किंवा समुद्राच्या किनाऱ्यावरच झाली असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले. जेव्हा आजूबाजूला जमीन असेल तेव्हाच नदी किंवा समुद्राला किनारा असू शकेल.

    सिंहभूमची निर्मिती ३२० कोटी वर्षांपूर्वी

    जेव्हा या बलुआ दगडांचे वय निश्चित करण्यात आले, तेव्हा सिंहभूम परिसर हा ३२० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्याचे समोर आले. याचा अर्थ असा की ३२० कोटी वर्षांपूर्वी हा भूखंड किंवा हे महाद्विप समुद्रापेक्षा वेगळे, बाहेर आलेले होते. आत्तापर्यंत अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे समुद्रातून पहिल्यांदा बाहेर आलेले महाद्विप असल्याचे मानले जात होते. आता या संशोधकांनी सिंहभूम हा भूखंड समुद्रातून पहिला बाहेर आलेला जगातील भूखंड असल्याचा दावा केला आहे. हा क्षण यासर्वच संशोधकांसाठी रोमांचकारी क्षण होता.

    सिंहभूम महाद्वीप अशी या परिसराची ओळख

    सिंहभूमच्या ग्रेनाईटच्या दगडांच्या तपासणीत समोर आले आहे की, सिंहभूम महाद्वीप सुमारे ३५० ते ३२० कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या गतिविधींमुळे तयार झाला. याचा अर्थ असा की ३२० कोटी वर्षांपूर्वी सिंहभूम महाद्विप समुद्रातून बाहेर आला असला, तरी त्याची प्रक्रिया त्या पूर्वीपासूनच सुरु झाली होती.  या महाद्विपात, उत्तरेकडून जमशेदपूरपासून दक्षिणेत महागिरीपर्यंतचा आणि पूर्वेकडून ओडिशाच्या सिमलीपालपासून पश्चिमेच्या वीर टोलापर्यंतच्या परिसराचा समावेश आहे. या संशोधनात सिमलीपाल, जोडा, जमशेदपूर या परिसरात फिल्ड वर्क करण्यात आले होते.

    पुढील संशोधनाचा मार्गही खुला

    सिंहभूम हा जगातील पहिला द्वीप असल्याचे समोर आल्याने, या परिसरातील पर्वत, डोंगर हे ३२० कोटी वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे. आता या संशोधनानंतर या पर्वतांत, लोह खनिजे, सोन्यांच्या खाणी शोधण्याचा मार्ग खुला झाला आहे. यासह बस्तर, धारवाड परिसरातही भूमिगत घटनांच्या उत्पत्तीची माहिती मिळू शकेल. भूगर्भातील अध्ययनासाठीही या संशोधनाचा आगामी काळात उपयोग होऊ शकेल.

    या रिसर्च टीममध्ये सात वैज्ञानिकांचा समावेश होता. त्यात ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाचे पीटर केवूड, जैबक मल्डर, शुभोजीत राय, प्रियदर्शी चौधरी आणि ऑलिवर नेबेल यांचा समावेश होता. यासह ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाच्या ऐश्ली वेनराईट, अमेरिकेतील कॉलेफोर्निय़ातील सूर्यजेंद्रू भट्टाचार्यी, यासह दिल्ली विद्यापीठातील शुभम मुखर्जी यांचा समावेश होता.

    जगातला कोणता भूखंड समुद्तून पहिल्यांदा बाहेर आला. या प्रश्नाचे उत्तर गेले कित्येक वर्षे शोधण्यात येत आहे. आत्तापर्यंत हेच मानण्यात येत होते की अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सर्वात पहिल्यांदा समुद्रातून बाहेर आले होते. मात्र आता नव्या शोधाने हा समज खोटा ठरवला आहे. झारखंड राज्यातील सिंहभूम हा जिल्हा समुद्रातून बाहेर पडलेला पहिला भूखंड, महाद्विप असल्याचा शोध वैज्ञानिकांनी सात वर्षांच्या अथक शोधानंतर लावला आहे. यात तीन देशांच्या सात संशोधकांचा समावेश आहे(India, the world’s first continent to emerge from the sea! The site, which is 200 million years older than Africa and Australia, was discovered after seven years of exploration).