azadi ka amrit mahotsav by indian navy

भारतीय नौदलानेही (Indian Navy) महत्त्वाची मोहिम हाती घेतली आहे. भारतीय नौदलाजी जहाजे जगातील प्रत्येक खंडामध्ये जाणार आहेत. तसेच या जहाजांवर स्वातंत्र्य दिनाचा (Celebration Of Azadi ka Amrit Mahotsav) कार्यक्रम साजरा होणार आहे.

  मुंबई: भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष (75 Years Of Independence) झाली आहेत. त्यामुळे देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानेही (Indian Navy) महत्त्वाची मोहिम हाती घेतली आहे. भारतीय नौदलाजी जहाजे जगातील प्रत्येक खंडामध्ये जाणार आहेत. तसेच या जहाजांवर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, फक्त अंटार्टिक्टा खंडात नौदलाचं जहाजं जाणार नाहीत. कोणत्या खंडात कोणत्या ठिकाणी कोणते जहाज जाणार आहे याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  १) आशिया खंड : मस्कत, ओमान – आयएनएस चेन्नई आणि आयएनएस बेटवा,
  सिंगापूर – आयएनएस सरयू
  २) आफ्रीका खंड : मोंबासा, केनिया – आयएनएस त्रिकंद
  ३) ऑस्ट्रेलिया खंड : पर्थ ऑस्ट्रेलिया, आयएनएस सुमेध
  ४) उत्तर अमेरिका खंड : सॅन डिएगो, युएसए – आयएनएस सातपुडा
  ५) दक्षिण अमेरिका खंड – रिओ दे जानिरिओ, ब्राझील – आयएनएस तरकश
  ६)  युरोप खंड : लंडन , युके – आयएनएस तरंगिणी

  या खंडातील ज्या ज्या ठिकाणी ही जहाजं जाणार आहेत त्या त्या ठिकाणी १५ ऑगस्ट २०२२ ला विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या जहाजांवर भारताचा तिरंगा फडकावण्यात येणार आहे. सहा खंड, तीन महासागर आणि सहा वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये हा कार्यक्रम साजरा होणार आहे.