Indian world record; The largest ball pen of 37 kg

जगातील सर्वांत मोठे बॉलपेन बनवण्याचा विश्वविक्रम भारतीय व्यक्तीने आपल्या नावे केला. पेन इतके मोठे आहे की, आपण कदाचित कल्पनाही केली नसेल. पेन 5.5 मीटर (18 फूट, 0.53 इंच) उंच आहे आणि याचे वजन तब्बल 37.23 किलो आहे. हैदराबादचे रहिवासी आचार्य माकुनुरी श्रीनिवास यांनी हे भलेमोठे पेन बनवले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्याची नोंद झाली(Indian world record; The largest ballpoint pen of 37 kg).

    हैदराबाद : जगातील सर्वांत मोठे बॉलपेन बनवण्याचा विश्वविक्रम भारतीय व्यक्तीने आपल्या नावे केला. पेन इतके मोठे आहे की, आपण कदाचित कल्पनाही केली नसेल. पेन 5.5 मीटर (18 फूट, 0.53 इंच) उंच आहे आणि याचे वजन तब्बल 37.23 किलो आहे. हैदराबादचे रहिवासी आचार्य माकुनुरी श्रीनिवास यांनी हे भलेमोठे पेन बनवले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्याची नोंद झाली(Indian world record; The largest ballpoint pen of 37 kg).

    पेनासाठी 9 किलो पितळ वापरले आहे. 1.45 मीटरच्या फरकासह या पेनने आधीचा विश्वविक्रमही मोडीत काढला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने पेनचा व्हीडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. पेन बनविणारे श्रीनिवास म्हणाले की, लहानपणी जेव्हा आई लिहिण्यासाठी पेन हातात द्यायची, त्यावेळी मोठे झाल्यावर मी एक अद्वितीय पेन डिझाइन करेन, अशी कल्पना करायचो.

    या पेनने लिहिता येते. पण पेन हातात पकडण्यासाठी 5 ते 6 जणांची गरज लागते. श्रीनिवास यांनी कागदावर एक प्रतीकात्मक चेहरा काढून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या टीमला दाखवले. पेनावर 9 प्रकारचे नृत्यप्रकार व भारतीय वाद्ये कोरली आहेत.