देशातील पहिल्या 6G प्रयोगशाळेचं दूरसंचार मंत्रीअश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन, डिजिटल तंत्रज्ञानाकडे पुन्हा एक पाऊल!

अश्विनी वैष्णव म्हणाले की, डिजिटल इंडियाचा आपल्या सर्व भारतीयांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला. भारताला नवनिर्मितीचे केंद्र बनवणे हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या अंतर्गत भारत आणि जगासाठी डिजिटल तंत्रज्ञान भारतातच विकसित करायचे आहे.

    भारताला भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये पुढे नेण्यासाठी आणि केवळ वापरकर्ता न राहता त्या क्षेत्रातील एक तत्रंज्ञ बनण्यासाठी देशातील पहिली थेट 6G लॅब (India’s first 6G Lab) गुरुवारी बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नोकिया 6G प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. याद्वारे, शिक्षणतज्ज्ञांपासून ते स्टार्टअपपर्यंत प्रत्येकजण तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित काम आणि संशोधन उपक्रम राबवू शकतील. याशिवाय तांत्रिक दर्जा आणि उपयुक्तता या क्षेत्रातही काम केले जाणार आहे.

    यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले की, डिजिटल इंडियाचा आपल्या सर्व भारतीयांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. भारताला नवनिर्मितीचे केंद्र बनवणे हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या अंतर्गत भारत आणि जगासाठी डिजिटल तंत्रज्ञान भारतातच विकसित करायचे आहे. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, ही Nokia 6G लॅब बेंगळुरूमध्ये सुरू होत आहे. येथून, वाहतूक सुरक्षा, शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी 6G तंत्रज्ञानाच्या मनोरंजक वापर प्रकरणांचा अभ्यास केला जाईल. संपूर्ण डिजिटल इंडियासाठी हे मोठे योगदान असेल.

    भारतातील 5G ​​चा वेग अनेक मोठ्या देशांपेक्षा जास्त

    नोकिया कंपनीचे सीईओ आणि अध्यक्ष पेक्का लुंडमार्क यांनी सांगितले की, भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे 5G नेटवर्क आहे. त्याची सुरुवात विलक्षण गतीने झाली. भारतातील 5G ​​डाउनलोडचा वेग अनेक विकसित देशांपेक्षा वेगवान आहे. आतापर्यंत केलेल्या कामावर आम्ही समाधानी आहोत, पण तरीही खूप काम करता येईल. नोकिया भारतीय उद्योग, समाज आणि लोकांची सेवा करण्यासाठी डिजिटल इंडियाला पाठिंबा देत राहील. उल्लेखनीय आहे की मार्चमध्ये लंडमार्क यांनी पंतप्रधान मोदी यांची भारत भेटीदरम्यान भेट घेतली होती. 6G संशोधन प्रयोगशाळा स्थापन करण्यावर चर्चा झाली होती.