देशातील पहिले प्रवासी ड्रोन ‘वरुण’ तयार, १३० किलो वजन उचलण्यास सक्षम

कंपनीचे सह-संस्थापक बब्बर यांनी सांगितले की, हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही ड्रोन सुरक्षित लँडिंग करण्यास सक्षम आहे. यात पॅराशूट देखील आहे, जे आपत्कालीन किंवा खराबी दरम्यान आपोआप उघडेल आणि ड्रोन सुरक्षितपणे उतरेल.

    नवी दिल्ली – भारतीय नौदलासाठी देशातील पहिले पॅसेंजर ड्रोन महाराष्ट्रात तयार करण्यात आले आहे. ‘वरुण’ असे या ड्रोनचे नाव आहे. हे १३० किलो वजनासह उड्डाण करू शकते, जे २५ ते ३३ मिनिटांत २५ किमीचा प्रवास पूर्ण करेल. पुण्याच्या चाकण सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनीने हे ड्रोन बनवले आहे.

    कंपनीचे सह-संस्थापक बब्बर यांनी सांगितले की, हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही ड्रोन सुरक्षित लँडिंग करण्यास सक्षम आहे. यात पॅराशूट देखील आहे, जे आपत्कालीन किंवा खराबी दरम्यान आपोआप उघडेल आणि ड्रोन सुरक्षितपणे उतरेल. यासोबतच वरुणचा वापर एअर अॅम्ब्युलन्ससाठी आणि दूरच्या भागात सामान पोहोचवण्यासाठी करता येईल.

    ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित आहे. म्हणजेच नौदलाच्या अधिकाऱ्यांना फक्त त्यात बसावे लागेल, ड्रोनच त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल. वरुणच्या सागरी चाचण्या येत्या ३ महिन्यांत सुरू होणार आहेत.