
भारतामध्ये बनवलेल्या बलाढ्य युद्धनौकांपैकी एक, INS मुरमुगावची लांबी 163 मीटर आणि रुंदी 17 मीटर आणि वजन 7,400 टन आहे. जहाज चार शक्तिशाली गॅस टर्बाइनने सुसज्ज आहे आणि ते 30 नॉट्सपेक्षा जास्त वेगाने पोहोचू शकते.
भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS मुरमुगाव सामील करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या (18 डिसेंबर) रोजी स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका ‘मोरमुगाव’ भारतीय नौदलाला समर्पित करतील. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलात सामील करण्यात येणार आहे. यामुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाची पोहोच वाढेल आणि देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक मजबूत होईल. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.
काय खास आहे INS मुरमुगाव मध्ये
भारतीय नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाईन ब्युरो’ द्वारे विनाशकारी युद्धनौकेचे डिझाईन तयार केले गेले आहे आणि माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांनी बांधले आहे. INS मुरगाव हे नाव पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यातील ऐतिहासिक बंदर शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याच्या मुक्तीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने INS मुरगावने गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी प्रथमच समुद्रात उतरवले. भारतामध्ये बनवलेल्या बलाढ्य युद्धनौकांपैकी एक, INS मुरमुगावची लांबी 163 मीटर आणि रुंदी 17 मीटर आणि वजन 7,400 टन आहे. जहाज चार शक्तिशाली गॅस टर्बाइनने सुसज्ज आहे आणि ते 30 नॉट्सपेक्षा जास्त वेगाने पोहोचू शकते. आयएनएस मुरगावची क्षणचित्रे आयएनएस मुरगाव ब्रह्मोस आणि बराक-8 सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. हे इस्रायलच्या MF-STAR रडारने सुसज्ज आहे, जे हवेतील लांब पल्ल्याचे लक्ष्य शोधू शकते. 127 मिमीच्या तोफेने सज्ज असलेली INS मुरमुगाव 300 किमी अंतरापर्यंतचे लक्ष्य वेधण्यात सक्षम आहे. यात AK-630 क्षेपणास्त्रविरोधी तोफा प्रणाली बसवण्यात आली आहे. याशिवाय, हे अँटी-सबमरीन रॉकेट लाँचरने सुसज्ज आहे.