inflation

फेब्रुवारी महिन्यात ठोक महागाईत वाढ(Inflation rise) झाली असून ती ४.१७ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या २७ महिन्यातील ही विक्रमी वाढ आहे. खाद्यपदार्थ आणि इंधन, वीजेचे दर वाढल्यामुळे चलनफुगवटाही वाढला आहे.

  दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात अर्थव्यवस्थेत(Indian economy) पुन्हा एकदा चिंतेचे सावट पसरले आहे. फेब्रुवारी महिन्यात ठोक महागाईत वाढ झाली असून ती ४.१७ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या २७ महिन्यातील ही विक्रमी वाढ आहे. खाद्यपदार्थ आणि इंधन, वीजेचे दर वाढल्यामुळे चलनफुगवटाही वाढला आहे. त्यामुळे यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

  दुसरीकडे, जानेवारी महिन्यात महागाईची टक्केवारी २.०३ होती तर एक वर्षापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये याच समान कालावधीत ती २.२६% होती. सरकारी आकडेवारीवरून ही माहिती प्राप्त झाली आहे.

  इंधन-ऊर्जा क्षेत्रातही खर्च वाढला

  फेब्रुवारी महिन्यात कारखान्यातील उत्पादनातही ठोक महागाईत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारीत ही टक्केवारी ५.८१% आहे तर जानेवारीत ही टक्केवारी ५.१३% होती. महिनाभराच्या आकडेवारीचे अवलोकन करता इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातही महागाई वाढल्याचे दिसून येते.

  खाद्यपदार्थांचे दर वाढले
  फेब्रुवारी महिन्यात खाद्य पदार्थांच्या दरात १.३६% वाढ झाली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात २.८०% घट झाल्याचे दिसून आले होते. याशिवाय भाजीपाल्याचे दरही फेब्रुवारी महिन्यात २.९०% कमी झाले होते तर जानेवारी महिन्यात तब्ब २०.८२% घट झाल्याची नोंद झाली होती.

  डाळीच्या दरातही वाढ

  फेब्रुवारी महिन्यात डाळीच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. डाळींच्या दरात १०.२५% वाढ झाली असून फळांचे दर ९.४८% वाढले आहेत. दरम्यान, गेल्याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता. आढावा बैठकीत बदल न करण्याची ही चौथी वेळ होती.