anurag thakur

भारतातील ७४७ वेबसाईट्स (747 Website Banned), १९ सोशल मीडिया अकाऊंट्स आणि ९४ यू ट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.

    नवी दिल्लीः माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी देशविरोधी मजकूर असणाऱ्या भारतातील ७४७ वेबसाईट्स (747 Website Banned), १९ सोशल मीडिया अकाऊंट्स आणि ९४ यू ट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आल्याची माहिती राज्यसभेत (Rajyasabha) दिली आहे. ठाकूर म्हणाले की २०२१-२२ मध्ये अशी कारवाई करण्यात आली होती.

    माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६९ अ कलमानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारने देशाच्या सार्वभौमत्ववाविरोधात जे इंटरनेटवर खोट्या बातम्या पसरवत आहेत आणि प्रोपोगांडा करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. याआधी ठाकूर यांनी लोकसभेमध्ये लेखी स्वरूपात कळवले होते की केंद्राने ६०० युट्यूब चॅनेल आणि युआरएल ब्लॉक करण्याचा विचार करत आहे.