Inside a 77-year-old pen hospital in Kolkata

रुग्णालयात सामान्यत: आजारी लोकांवर उपचार करण्यात येतात. परंतु पश्चिम बंगालच्या कोलकात्यात असे रुग्णालय आहे जिथे पेनांवर उपचार करण्यात येतात. याचे नावदेखील 'पेन हॉस्पिटल' असे आहे. येथे जुन्या व खराब झालेले पेन ठीक करण्यात येतात. हे दुकान 77 वर्षे जुने आहे(Inside a 77-year-old pen hospital in Kolkata).

    कोलकाता :  रुग्णालयात सामान्यत: आजारी लोकांवर उपचार करण्यात येतात. परंतु पश्चिम बंगालच्या कोलकात्यात असे रुग्णालय आहे जिथे पेनांवर उपचार करण्यात येतात. याचे नावदेखील ‘पेन हॉस्पिटल’ असे आहे. येथे जुन्या व खराब झालेले पेन ठीक करण्यात येतात. हे दुकान 77 वर्षे जुने आहे(Inside a 77-year-old pen hospital in Kolkata).

    धर्मतळा मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 4 च्या बाहेर पडताच फुटपाथच्या डाव्या बाजूला एका दुकानाच्या बाहेर ‘पेन हॉस्पिटल’ असे लिहिलेले दिसते. हे दुकान मोहम्मद इम्तियाज यांचे आहे. इम्तियाज यांचे आजोबा समसुद्दीन यांनी 1945 मध्ये हे दुकान उघडले होते. त्यानंतर इम्तियाज यांचे वडील व आता ते स्वत: हे दुकान चालवितात.

    इम्तियाज यांनी सांगितले की, पूर्वी वॉटरमॅन, शेफर्ड, पियरे कार्डा व विल्सनसारखे महागडे पेन परदेशातून आणले जात होते. खराब झाल्यानंतर त्यांना दुरुस्त करण्यासाठी कोणीही मिळत नव्हते. तेव्हा त्यांच्या आजोबांनी हे पेन हॉस्पिटल सुरू केले. सध्या इम्तियाज यांच्याकडे अनेक पुरातन पेनांचा संग्रह आहे. या पेनांची किंमत 20 रुपयांपासून 20,000पर्यंत आहे.