
तांत्रिक पद्धतीचा अवलंब करुन त्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी सुलभ इंटरनॅशनल सोश सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना केली.
नवी दिल्ली – टॉयलेट क्रांतीचे जनक आमि सुलवभ इंटरनॅशनलचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (Bindeshwar Pathak) यांचं मंगळवारी निधन झालं. दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये कार्डियल अरेस्टमुळे (cardiac arrest) त्यांचा मृत्यू झाला. ते 80 वर्षांचे होते. पाठक यांची ओळख भारतात स्वच्छतेचा सांताक्लॉझ अशी होती, तर काही जण त्यांना टॉयलेट मॅन (Toilet Man) म्हणून ओळखत. पाठक यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांच्या कार्यालयात ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर ते लगेच खाली पडले. त्यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात आलं, तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
सुलभ इंटरनॅशनलची स्थापना पाठक यांनी केली होती. ही एक सामाजिक संघटना आहे, जी शिक्षणाच्या माध्यमातून मानवाधिकार, पर्यावरण, स्वच्छता, वेस्ट मॅनेजमेंटसह सुधारणांना गती देण्यासाठी कार्य करते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाठक यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
बिंदेश्वर पाठक यांची कारकीर्द
बिंडेश्वर पाठक यांनी 1970 साली सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली होती. उघड्यावर शौच आणि अस्वच्छ सार्वजनिक शौचालयं यांच्यावर मात करण्यासाठी याची स्थापना करण्यता आली. त्यानंतर काही वर्षांत सुलभ हे नाव सार्वजनिक शौचालयांची ओळख झाली. या संघटनेनं केलेल्या कष्टामुळे आणि प्रयत्नांमुळे देशात सार्वजनिक शौचालयांची प्रतिमा बदलण्यात मोलाटा वाटा उचलला. स्वस्त टॉयलेट व्यवस्था देशात उभी राहिली, ज्यामुळे लाखो, कोट्यवधी भारतीयांचं जीवन अधिकरक सुखकर होऊ शकलं. सुलभ शौचालयांनी देशभरात स्वच्छतेबाबत क्रांती केली. लाखो जण आजही स्वच्छ आणि सन्मानजनक शौचालयांचा वापर यामुळं करु शकले.
हातानं मैला उचलण्याचा कलंक मिटवण्याचा आणि अशा लोकांचं जीवन सुधारण्याचा एक व्यापक विचार पाठक यांच्या दूरदृष्टीत होता. अशा समाजाला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. विधवांसाठी सुलभनं एक नवी संधी निर्माण केली. यातून त्यांच्यावर असलेले प्रतिबंध, अपमान यातून त्यांना मुक्ती मिळाली.
75 रुपयांत केली होती सुरुवात
हा विचार जेव्हा सुरु करण्याचा विचार केला, त्यावेळी पाठक यांच्यासोबत 9 जणं होते. त्यातील प्रत्येकान 5 ते 10 रुपयांची मदत केली. हे सगळे एकत्र केल्यानंतर 75 रुपये जमा झाले. ना कोणतं साधन होतं, ना परिचय होता ना कामाची पद्धत माहीत होती. एका घरातून या कामाची सुरुवात करण्यात आली. काम सुरु असताना त्याची गरज, महत्त्व लक्षात येत गेलं. समस्या काय आहे आणि त्यावरचा उपाय दृष्टीपथात आला. कामाप्रति निष्ठा होतीच, त्याचबरोबर क्षमतेचा विकास झाला. या सगळ्यांच्या मेहनतीतून जगातील नंबर 1 ची संस्था असा नावलौकिक मिळू शकला.
सुरुवातीच्या काळात पाठक यांच्यासह संस्थेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय कामही केलं, मात्र त्याचा फटका संस्थेला बसला. त्यानंतर ठरवून राजकारणापासून दूर राहण्याचं ठरवण्यात आलं. सुरुवातीला समाजशास्त्राचं शिक्षक होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ते स्वप्न पूर्ण होू सकलं नाही. इतर नोकऱ्या केल्या पण त्याच्या मन रमेना. अखेरीस बिहार गांधी जन्म शताब्दी समिती या संस्थेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत झाले. या समितीत सक्रिय झाल्यानंतर मैला वाहून नेण्याच्या प्रथेबाबत चर्चा झाली आणि हे कृत्य अमानवीय. असल्याचा सूर व्यक्त होऊ लागला. ही प्रथा बंद व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती. पाठक यांनी हे काम करावं यासाठी समितीत आग्रह धरण्यात आला. त्यानंतर पाठक काही महिने बैतियाला जाऊन राहिले. वाल्मिकी समाजात जाऊन त्यांनी या सगळ्यांचं जीवन जवळून पाहिलं, अनुभवलं.
दोन घटनांचा मनावर मोठा परिणाम
या समाजात एक नववधू लग्न होऊन आली होती. तिची सासू तिला मैला वाहण्याच्या कामावर पाठवत होती, मात्र नववधू हे करण्यास तयार नव्हती, रडत होती. तिनं जर मैला वाहण्याचं काम केलं नाही तर ती दुसरं काम करु शकणार नाही. लोकं तिला स्पर्श करणार नाहीत, त्यामुळे तिची उपजिविका कशी चालेल, असा तिच्या सासूचा प्रश्न होता. त्यावर पाठक यांच्याकडं तेव्हा उत्तर नव्हतं. याच समाजातल्या एका मुलावर रस्त्यात असलेल्या एका सांडानं हल्ला केला. लोकं त्याला वाचवण्यासाठी धावले मात्र कुणीतरी सांगितलं की हा वालिमिकी कॉलनीतला आहे. त्यानंतर लोकं त्याला स्पर्श करण्यास धजावेनात. पाठक त्याला घेून रुग्णालयात गेले मात्र तिथं त्या मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनंतर गांधींजींचं स्वप्न पूर्ण करण्याचं त्यांनी मनात घेतलं. या समाजाची अवस्था दररोज हजारदा मृत्यू येण्यासारखी होती. सुरुवातीला पाठक यांना विरोधही सहन करावा लागला.
भारतात मैला वाहून नेण्याच्या समस्येचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केला. देशभर यासाठी त्यांनी प्रवास केला आणि याबाबत पीएचडी थिसीसही त्यांनी सादर केला. तांत्रिक पद्धतीचा अवलंब करुन त्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी सुलभ इंटरनॅशनल सोश सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना केली. पाठक यांनी ३ दशकांपूर्वी सुलभ शौचालयांना फर्मेन्टेशन प्लँटना जोडून बायोगॅस तयार करण्याचं डिझाईन तयार केलं. आता हा पॅटर्न जगभरातील विकसनशील देशांमध्ये स्वच्छतेचा पर्याय ठरलाय.
पाठक यांच्या या प्रकल्पाचं एक वैशिष्ठ्य असं होतं की, गंधमुक्त बायोगॅसचं उत्पादन यातून होत होतं. तसचं फॉस्फरस आणि इतर अवशेषातून स्वच्छ पाणी सोडते, जैविक खताचा हा महत्त्वाचा भाग आहे. या आंदोलनातून स्वच्छता विकसीत झाली. ग्रामीण भागात सुविधा पोहचवणारी ही युक्ती आता दक्षिण अफ्रिकेतही वापरण्यात येतेय. पाठक यांना या कार्यासाठी जगभरात अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आलं. यात पद्मभूषण, एनर्जी ग्लोब अवॉर्ड, दुबई इंटरनॅशनल अवॉर्ड, स्टॉकहोम वॉटर प्राईज अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.