जगभरातील आयटी क्षेत्रातील बूम संपला का? नामांकित कंपन्या का करतायेत नोकर कपात? भारताला मोठा फटका सहन करावा लागणार? काय आहे सध्या चित्र…

कित्येक भारतीयांना कंपन्यातून नारळ दिला आहे, त्यामुळं त्यांच्यावर बेरोजगारीची परिणामी उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्वजण दुसरीकडे नोकरी शोधताहेत किंवा मायदेशात येण्याच्या तयारीत आहेत. सध्या जगावर आर्थिक मंदीचं सावट आहे, अशा स्थितीत नोकर कपातीचा फटका भारतासह अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे.

  नवी दिल्ली– मागील काही दिवसांपासून जगभरातील अनेक आयटी कंपन्यातून (IT Com) नोकर कपात करताहेत. जागतिक आर्थिक (Economics) मंदीचे सावट ओळखून तसेच कंपन्यांना होत असलेला तोटा ओळखून ही नोकर कपात असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुगलसह मायक्रोसॉफ्ट, एमेझॉन, ट्विटर, फेसबुक (Microsoft, Amazon, Twitter, Facebook) आदी कंपन्यातून नोकर कपात केली आहे. भारतातील मोठ्या संख्येनं परदेशात आयटीत मुलं, मुली काम करताहेत. त्यातील कित्येक भारतीयांना कंपन्यातून नारळ दिला आहे, त्यामुळं त्यांच्यावर बेरोजगारीची परिणामी उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्वजण दुसरीकडे नोकरी शोधताहेत किंवा मायदेशात येण्याच्या तयारीत आहेत. सध्या जगावर आर्थिक मंदीचं सावट आहे, अशा स्थितीत नोकर कपातीचा फटका भारतासह अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे.

  परदेशात भारतीय कर्मचारी अधिक…

  दरम्यान, मागील काही वर्षापासून किंवा ग्लोबलायझेन झाल्यापासून मागील वीस पंचवीस वर्षापासून परदेशात नोकरीसाठी जाण्याकडे भारतीयांचा कल वाढला आहे. गूगल वा मायक्रोसॉफ्ट वा अ‍ॅमेझॉन अशा कंपनीतील चाकरी ही आयुष्याची हमी व सुरक्षा समजली जात होती. या कंपन्यांत मोठय़ा संख्येने भारतीय आहेत. स्थानिकांच्या तुलनेत स्वस्तात गुणवान अभियंते आणि कुशल कर्मचारी अव्याहत पुरवठा हे तर आपले वैशिष्टय़. अमेरिका व युरोपातील अनेक विकसित देशांत मोठ्या प्रमाणात भारतीय कर्मचारी आहेत, मात्र सध्या या कंपन्यात बेरोजगारी कुऱ्हाड आल्याने त्यांनी परतीचा मार्ग म्हणजे मायदेशात परताहेत किंवा नोकरीचा वेगळा पर्याय सुरु आहे.

  अमेरिकेत साठ हजारांवर बेरोजगार…

  एका आकडेवारीनुसार किमान ६० हजार इतके अमेरिकेत रोजगाराच्या शोधात असल्याचे सत्य समोर येते. अर्थात ६० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. गूगल, मायक्रोसॉफ्टादी कंपन्यांनी या इतक्या साऱ्यांस नारळ दिला आहे. मायक्रोसॉफ्ट, गूगल या कंपन्यांचे प्रमुख सत्या नाडेला, सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे असून देखील भारतीयांना या कपन्यातून काढले जात आहे. तर जगातील अन्य देशात हजारो कर्मचाऱ्यांना आयटी कंपन्यातून काढून टाकले आहे. त्यामुळ ह्या सर्व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अमेरिकी माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार केवळ माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांतून गेल्या काही दिवसांत किमान दोन लाख इतक्या सणसणीत संख्येने कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. यापैकी किमान ६० हजार हे इतके भारतीय असून अमेरिकास्थित या भारतीयांसमोर पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा आहे.

  …तर मायदेशी येण्याशिवाय पर्याय नाही

  नव्वदच्या दशकात कुवेत युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटात हजारो भारतीयांवर मायदेशी परतण्याची वेळ आली होती. त्या वेळी गोवा, केरळ अशा राज्यांत अडचण झाली. ही राज्ये प्रामुख्याने पश्चिम आशियाच्या आखातात मानवी श्रम निर्यात करतात. त्यातील बरेचसे कामगार अकुशल होते. आताच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांतील संकटाचे तसे नाही. ते सर्व कुशल आणि उच्चविद्याविभूषित आहेत. आता या सर्वाच्या भवितव्याबाबत चिंता करावी अशी परिस्थिती दिसते. एकटय़ा अमेरिकेत समजा या ६० हजार बेरोजगार भारतीयांच्या हातास काम मिळाले नाही तर त्यांच्यासमोर मायदेशाच्या आसऱ्यास येण्याखेरीज पर्याय राहणार नाही.