इस्कॉन कसाईंना गायी विकतात.. मनेका गांधींचा गंभीर आरोप ; ट्रस्टने आरोप फेंटाळले, म्हणाले…

भाजप खासदार मनेका गांधी यांनी इस्कॉनवर गंभीर आरोप केले आहेत. मेनका गांधी यांनी दावा केला आहे की, इस्कॉन आपल्या गोवंशाच्या गायी कसाईंना विकते. दुसरीकडे, इस्कॉनने मनेका यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले असून, भाजप खासदाराच्या आरोपांमुळे संघटना आश्चर्यचकित झाल्याचे म्हटले आहे.

  भाजप खासदार मनेका गांधी यांनी इस्कॉनवर गंभीर आरोप केले आहेत. मेनका गांधी यांनी दावा केला आहे की, इस्कॉन आपल्या गोवंशाच्या गायी कसाईंना विकते. दुसरीकडे, इस्कॉनने मनेका यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले असून, भाजप खासदाराच्या आरोपांमुळे संघटना आश्चर्यचकित झाल्याचे म्हटले आहे.

  काय म्हणाल्या मनेका गांधी?
  माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या इस्कॉन सर्वात मोठी फसवणूक करत असल्याचे सांगत आहे. हे लोक गोठ्याची काळजी घेतात आणि सरकार त्यांना सर्व प्रकारे मदत करते, ज्यामध्ये जमिनीचाही समावेश होतो. असे असतानाही ज्या गायी दूध देत नाहीत त्या कसायाच्या ताब्यात दिल्या जातात.

  आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील इस्कॉनच्या गाय आश्रयस्थानाचा उल्लेख करताना मनेका म्हणतात, ‘एकदा मी तिथे गेले होते. संपूर्ण गोठ्यात एकही गाय आढळली नाही जिने दूध दिले नाही. तसेच एकही वासरू सापडले नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ते (इस्कॉन) दूध न देणाऱ्या गायी आणि वासरे विकतात.

  मेनका गांधी पुढे म्हणतात की इस्कॉन आपल्या सर्व गायी कसाईंना विकते. या लोकांसारखे कोणीही वागत नाही. हेच लोक ‘हरे राम हरे कृष्ण’ म्हणत रस्त्यावर फिरतात आणि म्हणतात की आपलं संपूर्ण आयुष्य दुधावर अवलंबून आहे. मनेका पुढे म्हणतात, ‘कदाचित कोणीही त्याच्याइतक्या गायी कसायांना विकल्या नसतील.’

  इस्कॉनने दावा फेटाळला

  मनेका गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना इस्कॉनने ते निराधार असल्याचे म्हटले आहे. इस्कॉनचे राष्ट्रीय प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी सांगितले की, त्यांची संस्था केवळ भारतातच नाही तर जगभरात गायी आणि बैलांच्या संवर्धनासाठी काम करत आहे. गायी आणि बैल जिवंत असेपर्यंत इस्कॉनच्या गोठ्यात राहतात. एकही गाय, बैल किंवा वासरू कसाईंना विकले जात नाही.

  त्या आमच्या शुभचिंतक
  इस्कॉनकडून एक प्रेस रिलीझ जारी करण्यात आले आहे. ज्या देशात गोमांसाचा आहारात प्रामुख्याने समावेश आहे अशा देशातही इस्कॉन गायींच्या संवर्धनासाठी काम करत असल्याचे म्हटले आहे. मनेका गांधी या सुप्रसिद्ध प्राणी हक्क कार्यकर्त्या आहेत आणि त्या इस्कॉनच्या हितचिंतकही आहेत, त्यामुळे त्यांचे विधान धक्कादायक आहे.