चांद्रयान 3 ने चंद्रावर उतरल्यानंतर पाठवला चंद्राचा पहिला फोटो, पाहा जवळून कसा दिसतो चंद्र!

चांद्रयान-३ च्या लँडरने चंद्राची छायाचित्रे पाठवली आहेत. बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर हळूहळू उतरत असताना विक्रम लँडरने हे फोटो काढले होते.

  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग केल्यानंतर, इस्रोच्या चंद्र मिशन चांद्रयान-3 (Chandrayaan 3) च्या लँडरने चंद्राची छायाचित्रे पाठवली (Moon First Photo)आहेत. बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर हळूहळू उतरत असताना विक्रम लँडरने हे फोटो काढले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर चंद्रावर उतरणारा हा जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि सोव्हिएत युनियनने ही कामगिरी केली आहे.

  23 ऑगस्टला चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग

  इस्रोच्या चांद्रयान-३ च्या लँडर विक्रमने बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले. यादरम्यान केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नजरा टीव्हीच्या पडद्यावर खिळल्या होत्या. चांद्रयान-3 ने लँडिंग केल्यानंतर पाठवलेले फोटो इस्रोने शेअर केले आहेत. ISRO ने ट्विट केले की, “चांद्रयान-3 मिशन अपडेट, Ch-3 लँडर आणि MOX-ISTRAC, बेंगळुरू यांच्यात संपर्क दुवा स्थापित झाला आहे.” खाली उतरताना घेतलेल्या लँडरच्या क्षैतिज वेगाच्या कॅमेऱ्याची छायाचित्रे येथे शेअर केली जात आहेत.” इस्रोने शेअर केलेली ही एकूण चार छायाचित्रे आहेत.

  गेल्या वेळी चांद्रयान-2 ला शेवटच्या क्षणी यश मिळू शकले नाही. त्यानंतर चांद्रयान-2 च्या लँडरचे हार्ड लँडिंग झाले. याच कारणास्तव इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यावेळी चांद्रयान-३ मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. शेवटची 17 मिनिटे अत्यंत महत्त्वाची मानली गेली, जी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यातील सर्व प्रक्रिया पूर्वनिर्धारित योजनांनुसार चांगल्या प्रकारे पार पडल्या.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांचं केलं अभिनंदन

  यावेळी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले, “ज्यावेळी असा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर घडताना आपण पाहतो तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रीय जीवनाचे चिरंतन चैतन्य बनतात.