चांद्रयान-3 उतरल्यानंतर चंद्राचा पहिला व्हिडिओ आला समोर, पाहा कसा दिसतो तो चंद्र!

इस्रोने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये टच डाउनच्या वेळी चंद्र कसा दिसत होता हे पाहता येते. यापूर्वी लँडरमधून चंद्राची काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती.

    इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ (Chandrayaan 3 Landing) उतरवून इतिहास रचला. यासह चंद्राच्या दक्षिणेला पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-3 चे लँडर विक्रम चंद्रावर उतरल्यानंतर रोव्हर प्रज्ञान देखील बाहेर आले आणि आपले काम करू लागले. दरम्यान, चांद्रयान-३ च्या लँडिंगनंतर पहिला व्हिडिओ (Chandrayaan-3 Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ चांद्रयान-3 चंद्रावर हळूहळू उतरत असतानाचा आहे. इस्रोने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये टच डाउनच्या वेळी चंद्र कसा दिसत होता हे पाहता येते. याआधी लँडिंगनंतर लगेचच लँडर विक्रमने चंद्राची काही छायाचित्रेही (Chandrayaan-3 First Photo From Moon) पाठवली होती.

    चंद्रावर उतरतानाचा पहिला व्हिडिओ

    चांद्रयान-३ मोहिमेची ताजी माहिती देताना,  2.17 मिनिटांचा व्हिडिओ जारी केला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्रावर उतरत असताना लँडरवर लावलेल्या कॅमेऱ्यातून चंद्र दिसत होता. यामध्ये चंद्रावर अनेक प्रकारचे छोटे-मोठे खड्डेही दिसतात. लँडरच्या एका बाजूला विक्रम दिसतो, तर दुसऱ्या बाजूला लँडर चंद्राच्या जवळ जाताना दिसतो. लँडर जसजसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ जातो तसतसे तेथे असलेले खड्डे अधिक स्पष्टपणे दृश्यमान आणि मोठे होतात.

    ‘चांद्रयान-3’चे लँडर चिन्हांकित क्षेत्रात उतरले’ –  एस. सोमनाथ

    चांद्रयान-३ या अंतराळयानाचे लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावरील चिन्हांकित क्षेत्रात उतरले, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली. ” लँडिंग साइट 4.5 किमी बाय 2.5 किमी म्हणून चिन्हांकित केली गेली. मला वाटते की ती जागा आणि त्याचे अचूक केंद्र लँडिंगचे ठिकाण म्हणून ओळखले गेले होते. ते त्या ठिकाणापासून 300 मीटर आत आले. याचा अर्थ ते लँडिंगसाठी चिन्हांकित क्षेत्राच्या आत आहे.

    रोव्हरने काम करण्यास केली सुरुवात

    इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ या लँडरसह एलएमचे यशस्वीरित्या लँडिंग केले आणि अवकाशाच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला. सॉफ्ट लँडिंग केले.  भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला. इस्रोने गुरुवारी जाहीर केले की रोव्हर लँडरमधून बाहेर पडला आहे. इस्रो प्रमुखांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, रोव्हर आता चांगले काम करत आहे.