आयटी कंपन्याचे WFH नाहीतर हायब्रीड मॉडेलला प्राधान्य

कोविड-१९ महामारीमुळे सुरू झालेल्या घरातून काम (WFH) ने हळूहळू नवीन सामान्य रूप धारण केले आहे. आता आयटी आणि ऑनलाइन व्यवसाय करणारी जवळपास प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्यास परवानगी देत आहे.याला कर्मचाऱ्यांचाही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

  नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे सुरू झालेल्या घरातून काम (WFH) ने हळूहळू नवीन सामान्य रूप धारण केले आहे. आता आयटी आणि ऑनलाइन व्यवसाय करणारी जवळपास प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्यास परवानगी देत आहे.याला कर्मचाऱ्यांचाही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही जण कार्यालयात येऊन काम करण्यास प्राधान्य देत आहेत तर काही जण WFH पद्धतीवर खुश आहेत.

  भारतातील सर्वात मोठ्या टेक कंपन्या एचसीएल, इन्फोसिस आणि टीसीएस यांनी देखील कर्मचाऱ्यांना WFH दिले, परंतु आता या कंपन्या दीर्घ मुदतीसाठी ही पद्धत अवलंबणार आहे.तसेच या पैकी बऱ्याच कंपन्या आता हायब्रीड मॉडेलला पुढे घेऊन जाण्याचा विचार करत आहेत.

  टीसीएस

  कंपनीच्या वेबसाइटनुसार, “कोविड -१९ च्या प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात घरातून काम करण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र ही पद्धत आता दीर्घकाळ अवलंबावी लागणार असल्याचे दिसते. अनेक कंपन्यांना असे वाटते की जर त्यांनी कर्मचाऱ्यांना घरून कामाची सुविधा दिली तर ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील. TCS ने पूर्वी सांगितले होते की ते कामाच्या हायब्रीड मोडकडे जात आहे ज्यामध्ये कर्मचारी कार्यालयात आणि घरून अशा दोन्ही ठिकाणावरून काम करू शकतात. कंपनी २५*२५ पॉलिसी फॉलो करत आहे. यामध्ये, कंपनीचे केवळ २५ टक्के कर्मचारी एका वेळी एकाच कार्यालयात काम करतील. तसेच, त्यांना २५ टक्क्यांपेक्षा जास्त वेळ कार्यालयात घालवण्याची गरज नाही.

  इन्फोसिस

  आयटी कंपनी इन्फोसिस देखील हायब्रीड वर्किंग मॉडेलवर काम करत आहे. तथापि, कंपनीकडे कामाची ३-टप्प्यांची योजना आहे. पहिल्या टप्प्यात, कंपनीने विकास केंद्रांच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून २ दिवस कार्यालयात येण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. दुस-या टप्प्यात डेवलपमेंट सेंटर्सपासून दूर किंवा इतर कोणत्याही शहरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावण्याचाही कंपनीचा विचार आहे. त्याच वेळी, तिसऱ्या टप्प्यात म्हणजे दीर्घकालीन, कंपनी हायब्रिड मॉडेलवर काम करण्याचा विचार करत आहे.

  एचसीएल

  कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा आणि आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे एचसीएलने म्हटले आहे. एचसीएलच्या म्हणण्यानुसार, कंपनी आपल्या ग्राहकांना अखंडित सेवा देऊ इच्छिते, त्यामुळे सध्या कोरोनाची परिस्थिती तपासली जात आहे आणि हायब्रिड मॉडेल अंतर्गत काम करत आहे.