“तिथे बसून खोक्यांचं राजकारण सोप्पं…पण”, पाकिस्तानात जा म्हणणाऱ्यांनी आधी काश्मिरी पंडितांचं दु:ख ऐकावं; संजय राऊतांचा शिंदे-भाजपावर घणाघात, स्पष्टच म्हणाले…

देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते. काल संध्याकाळनंतर सर्वत्र हजारो मशाली पेटलेल्या दिसल्या. त्यामुळेच जम्मूत पाऊस असला तरी आम्ही त्या यात्रेत सहभागी होतोय, असं राऊत म्हणाले. माझं आज सकाळीच राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं.

    जम्मू: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) जम्मूला आले आहेत. संजय राऊत पहिल्यांदाच जम्मूत आले आहेत. यापूर्वी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. गुरुवारी रात्रीपासूनच जम्मूत पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसात देखील खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. भाजपला डिवचण्यासाठीच ठाकरे गट भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याची जोरदार चर्चा आहे.

    दरम्यान, आज खासदार संजय राऊत यांनी जम्मूत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर तसेच शिंदे गटावर टिका केली. राऊत जम्मूला जात आहेत, त्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानलाच जावं, अशी टिका शिंदे गटाकडून करण्यात आली होती, याचा राऊत यांनी समाचार घेत, शिंदे गटावर टिकास्त्र सोडले. पाकिस्तानात जा म्हणणाऱ्यांनी आधी काश्मिरी पंडितांचं दु:ख ऐकावं. जे आम्ही सातत्याने ऐकत आहोत. तिथे बसून खोक्यांचं राजकारण सोप्पं आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला. तसेच शिवसेनेचं चिन्हं आहे. पण तरुणांच्या हाती या धगधगत्या मशाली पाहून मला भरून आलं, असं राऊत म्हणाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या यात्रेने चांगला संदेश दिला आहे. देशात चांगली वातावरण निर्मिती झाली आहे.

    देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते. काल संध्याकाळनंतर सर्वत्र हजारो मशाली पेटलेल्या दिसल्या. त्यामुळेच जम्मूत पाऊस असला तरी आम्ही त्या यात्रेत सहभागी होतोय, असं राऊत म्हणाले. माझं आज सकाळीच राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. तुम्ही पावसात चालू नका. गाडीत बसून या, असं राहुल गांधी यांनी मला सांगितलं. त्यावर मी म्हणालो, आम्ही चालू आपल्याबरोबर, असं राऊत म्हणाले. तसेच आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निघाल्याचं सांगितलं.