बंगालमध्ये भाजपाला १० जागा जिंकणेही अशक्य; प्रशांत किशोर यांचे चॅलेंन्ज!

तृणमूलचे निवडणूक प्रभारी प्रशांत किशोर यांनी भाजपाला चॅलेंन्ज दिले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपाला दोन आकडी जागांचा पल्ला गाठणे अशक्य आहे असे प्रशांत किशोर म्हणाले.

कलकत्ता. पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे, परंतू निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहायला सुरवात झाली आहे. भाजपाने  २०० जागांचे लक्ष निर्धारित केले आहे. तर दुसरीकडे तृणमूलचे निवडणूक प्रभारी प्रशांत किशोर यांनी भाजपाला चॅलेंन्ज दिले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपाला दोन आकडी जागांचा पल्ला गाठणे अशक्य आहे असे प्रशांत किशोर म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्टकरून आपले म्हणणे मांडले. याशिवाय ही पोस्ट सेव्ह करून ठेवा असेही ते म्हणाले. 


बंगालमध्ये भाजपाची त्सुनामी- कैलाश विजयवर्गीय

बंगालचे भाजपा प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी प्रशांत किशोर यांचे नाव न घेता त्यांना उत्तर दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, भाजपाची बंगालमध्ये जी सुनामी चालली आहे, त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर देशाला एका चांगल्या निवडणूक रणनीतिकाराला मुकावे लागेल असे ते म्हणाले.

 

तृणमूलला बंडखोरीची किड, १० आमदारांचा भाजपात प्रवेश

गृहमंत्री अमित शहा शनिवारी आणि रविवारी बंगाल दौऱ्यावर ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय माजी मंत्री शुभेंदू अधिकारी ने शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपचा हात धरला. खासदार सुनील मंडल माजी खासदार शरदरथ तिर्की यांच्यासह १० आमदारांनी भाजपात प्रवेश केला. या पैकी ५ आमदार तृणमूल काँग्रेसचे आहेत. शाह म्हणाले की, निवडणूक येई पर्यंत ममता दीदी एकट्याच राहतील.