वक्त वक्त की बात! टाटांशी पंगा घेतलेला सायरस मिस्त्रींवर आली वाईट वेळ ; कंपनी कर्जात बुडाल्याने युरेका फोर्ब्स विकावी लागणार

ही कंपनी खरेदी करण्यासाठी प्राइवेट इक्विटी ग्रुप एडवेंट इंटरनॅशनल तयार झाली आहे. या व्यवहारासाठी एंटरप्राईज व्हॅल्यू ४४०० कोटी रुपये ठरविण्यात आली आहे.व्हॅक्यूम क्लिनर, वॉटर प्युरिफायर आदी उत्पादने युरेका फोर्ब्स कंपनी बनविते.युरेका फोर्ब्स सध्या नुकसानीत आहे. या कंपनीला लिस्टेड पॅरेंट कंपनी फोर्ब्स अँड कंपनी पासून वेगळे केले जाणार आहे.

    नवी दिल्ली :टाटा ग्रुपशी पंगा घेणाऱ्या सायरस मिस्त्रीं यांना त्यांची युरेका फोर्ब्स हि कंपनी विकावी लागणार आहे. शापूरजी पालोंजी ग्रुपची कंझ्युमर ड्युरेबल फ्लॅगशिप कंपनी युरेका फोर्ब्स सध्या कर्जाच्या गर्तेत बुडाली आहे. यामुळे मिस्त्रींना हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

    ४४०० कोटी रुपयांत करणार खरेदी कंपनी
    ही कंपनी खरेदी करण्यासाठी प्राइवेट इक्विटी ग्रुप एडवेंट इंटरनॅशनल तयार झाली आहे. या व्यवहारासाठी एंटरप्राईज व्हॅल्यू ४४०० कोटी रुपये ठरविण्यात आली आहे.व्हॅक्यूम क्लिनर, वॉटर प्युरिफायर आदी उत्पादने युरेका फोर्ब्स कंपनी बनविते.युरेका फोर्ब्स सध्या नुकसानीत आहे. या कंपनीला लिस्टेड पॅरेंट कंपनी फोर्ब्स अँड कंपनी पासून वेगळे केले जाणार आहे.

    टाटा ग्रुपची होल़्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये शापुरजी पालोनजी ग्रुपची १८ टक्के हिस्सेदारी आहे. परंतू आता या कंपनीवर२०००० कोटींचे कर्ज आहे.सायरस मिस्त्री यांना टाटाची धुरा देण्यात आली होती. परंतू नंतर झालेल्या वादामुळे रतन टाटांनी त्यांना अध्यक्षपदावरून काडून टाकले होते. यामुळे मिस्त्री न्यायालयात गेले होते. परंतू न्यायालयाने देखील मिस्त्री यांच्याविरोधात निकाल दिला होता.