jp nadda

गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळींकडून (Political Leader) एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. तसेच वादग्रस्त विधानेही केली जात आहेत. त्यानंतर आता भाजपने (BJP) या सर्वांची गंभीर दखल घेतली आहे.

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळींकडून (Political Leader) एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. तसेच वादग्रस्त विधानेही केली जात आहेत. त्यानंतर आता भाजपने (BJP) या सर्वांची गंभीर दखल घेतली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत सर्व खासदारांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत जे. पी. नड्डा यांनी खासदारांना कडक सूचना दिल्या आहेत. काही मुद्द्यांवर खासदारांना विधाने करण्यापासून परावृत्त करावे लागेल. खासदारांनी धार्मिक गोष्टी, सनातन धर्म आदी विषयांवर विधाने करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. पक्षात एक यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेनुसार पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच अशा विषयांवर विधाने करतात. धार्मिक बाबी, सनातन धर्म यासारख्या विषयांवर लक्ष दिले जाईल. राजकीय लोकांनी यात पडू नये, अनावश्यक विधाने करू नयेत. नेत्यांची बागेश्वर धामवर श्रद्धा आहे त्यांनी तिथे जावे पण अनावश्यक वक्तव्ये टाळावीत, असेही नड्डा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

    सतत वादग्रस्त विधानं

    गेल्या महिन्यांमध्ये राजकीय नेते अनेक वादग्रस्त विषयांवर विधाने करताना आपण ऐकले असतील. यात भाजपच्या नेत्यांचाही समवेश आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज आहेत. यातच आता भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.