जगदीप धनखड देशाचे उपराष्ट्रपती, मार्गारेट अल्वा यांचा मार्ग रोखला

देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपतीसाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजता मतदान संपले. मतदान सकाळी १० वा. सुरू झाले होते. त्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांनी आपला मताधिकार बजावला. सत्ताधारी एनडीएने जगदीप धनखड व विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.

    नवी दिल्ली – देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपतीसाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजता मतदान संपले. मतदान सकाळी १० वा. सुरू झाले होते. त्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांनी आपला मताधिकार बजावला. सत्ताधारी एनडीएने जगदीप धनखड व विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे. यात धनखड यांचा विजय झाला आहे.धनखड यांना ५२८ मते मिळाली तर मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली.

    यासंबंधीच्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजेपर्यंत ९३% हून अधिक मतदान झाले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्यसंख्या ७८८ एवढी आहे. TMC च्या ३९ खासदारांनी (२३ लोकसभा+१६ राज्यसभा) मतदानात सहभाग घेतला नाही. भाजपचे दोन्ही सभागृहांत ३९४ खासदार असून, हा आकडा बहुमताच्या आकड्याहून कितीतरी जास्त आहे.

    सद्यस्थितीत लोकसभेत ५४३, तर राज्यसभेत २४५ खासदार आहेत. वरिष्ट सभागृहातील ८ जागा रिक्त आहेत. म्हणजे इलेक्टोरल कॉलेज ७८० खासदारांचे आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. टीएमसीचे ३६ खासदार आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानात ७४४ खासदारच सहभागी होतील. ठरल्यानुसार एवढ्याच खासदारांनी मतदान केले तर ३७२ हा बहुमताचा जादुई आकडा असेल.