surat bus fire

ही बस रविवारी दुपारी सुमारे १ वाजता जयपूरहून रवाना झाली होती. रात्री सव्वा दहाच्या सुमारास बसमधील सर्व प्रवासी झोपलेले होते. यादरम्यान बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अचानक आग आग असा आवाज ऐकल्यानंतर चालकाने बस थांबवली.

    नवी दिल्ली – धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली आहे. रस्त्यावर धावतानाच बसने पेट घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. लोक ओरडायला लागले आणि जीव वाचवण्यासाठी खिडक्या तोडून उड्या मारायला लागले. आग्रा-लखनौ एक्सप्रेस-वेवर रविवारी रात्री १०.१५ वाजता ही घटना घडली. ही बस जयपूरहून नेपाळला जात होती. या बसमधून १७ प्रवासी प्रवास करत होते.

    ही बस रविवारी दुपारी सुमारे १ वाजता जयपूरहून रवाना झाली होती. रात्री सव्वा दहाच्या सुमारास बसमधील सर्व प्रवासी झोपलेले होते. यादरम्यान बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अचानक आग आग असा आवाज ऐकल्यानंतर चालकाने बस थांबवली. काही प्रवाशांनी खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या. काही दरवाजाकडे पळाले. हा हा म्हणता म्हणता बस पूर्णपणे जळून खाक झाली. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळाले.

    सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही किंवा कसलिही जीवितहानी झाली नाही. ऊसराहार ठाणे अधिकारी गंगादास गौतम यांनी सांगितले की घटना भरतीया जवळील चॅनल नंबर १३१+५०० जवळ घडली. उष्णता पकडल्याने बसमध्ये आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. मात्र बसमधील प्रवाशांचे सर्व सामान जळाले आहे. सर्व प्रवाशांना रात्रीच दुसऱ्या बसने पाठवण्यात आल्याचेही ते म्हणाले.