UPच्या सहारनपूरमधून जैशच्या दहशतवाद्याला अटक

पाकिस्तान (TIP) शी संबंधित संशयित दहशतवादी मोहम्मद नदीमला अटक करण्यात आली आहे. यूपी ATSच्या चौकशीदरम्यान, दहशतवादी नदीम म्हणाला, "जैशकडून त्याला भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्माला मारण्याचे काम देण्यात आले होते.

    नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथून जैश-ए-मोहम्मद (JEM) आणि तहरीक-ए-तालिबान, पाकिस्तान (TIP) शी संबंधित संशयित दहशतवादी मोहम्मद नदीमला अटक करण्यात आली आहे. यूपी ATSच्या चौकशीदरम्यान, दहशतवादी नदीम म्हणाला, “जैशकडून त्याला भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्माला मारण्याचे काम देण्यात आले होते.

    UP ATSनुसार, “माहिती मिळाली होती की, गाव कुंडाकला पोलीस स्टेशन गंगोह सहारनपूर गावात एक तरुण JeM आणि TTP च्या विचारसरणीने प्रभावित होऊन आत्मघातकी (फिदाईन) हल्ल्याच्या तयारीत आहे. त्यानंतर त्या तरुणाला पकडण्यात आले. चौकशी करण्यात आली असून त्याचा मोबाईल जप्त केला आहे.