16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

आज पंतप्रधान मोदींनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत, त्या सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

    नवी दिल्ली : देशात प्रत्येकवर्षी 16 जानेवारी हा दिवस देशात ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आज पंतप्रधान मोदींनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत, त्या सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

    दरम्यान, मोदींनी तीन महत्त्वाचे वैशिष्ट्ये असल्याचं आपल्या भाषणात सांगितलं. पहिलं वैशिष्यट्ये म्हणजे इंटरप्रेन्यूरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून ब्युरोक्रॅटिक्स सिलोसपासून मुक्त करणं हे होय. दुसरं वैशिष्ट्ये म्हणजे इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल मॅकेनिझमची निर्मिती करणं आणि तिसरं वैशिष्ट्ये म्हणजे तरुण इनोव्हेटर्स, युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणं हे होय, असं मोदी म्हणाले.

    आज ज्या पदधतीने भारत स्पीड आणि स्केलने भारत आज युवा स्टार्ट अप तयार करत आहे, त्यातून वैश्विक महामारीतही भारताची प्रबळ इच्छाशक्ती आणि संकल्प अधोरेखित होत आहे. पूर्वी चांगली स्थिती असताना एखाद दोन कंपन्या मोठ्या होत होत्या. मात्र गेल्या काही वर्षात देशात 42 युनिकॉर्न तयार करण्यात आले आहेत. हजारो कोट्यवधींच्या या कंपन्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. ही आत्मविश्वासी भारताची ओळख आहे. भारत आज वेगाने युनिकॉर्नची सेंच्युरी बनविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतातील स्टार्ट-अप्सचा सुवर्ण काळ आता सुरू झाला आहे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच इनोव्हेशनबाबतचं आकर्षण निर्माण करणं आणि इनोव्हेशनलला इन्स्टिट्यूशनलाईज करणं हा आमचा प्रयत्न आहे.

    दरम्यान, 2013-14मध्ये सुमारे 70 हजार ट्रेडमार्कसची नोंदणी करण्यात आली होती. तर 2020-21मध्ये अडीच लाखाहून अधिक ट्रेडमार्कसची नोंदणी करण्यात आली आहे. 2013-14 केवळ 4 हजार कॉपीराईट्सला मंजुरी मिळाली होती, गेल्यावर्षी ही संख्या वाढून 16 हजाराच्या पुढे गेली आहे. इनोव्हेशनबाबत देशात मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सममध्ये भारताची रँकिंग सुधारली आहे. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर असल्याचं मोदींनी सांगितलं