DU leader reached CM House to plead for justice

पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होत असतात. काही वाद हे अनेकदा टोकाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पत्नीला कंटाळलेल्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली आहे(JDU leader reached CM House to plead for justice).

    दिल्ली : पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होत असतात. काही वाद हे अनेकदा टोकाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पत्नीला कंटाळलेल्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली आहे(JDU leader reached CM House to plead for justice).

    दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर पोलिस ठाण्याच्या मेकना गावचे रहिवासी असलेले अवधेश लाल दास जेडीयूच्या मागास मोर्चाचे सरचिटणीस आहेत. मंगळवारी सकाळी न्याय मागण्यासाठी ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह 7 सर्कुलर रोड नितीश कुमार यांच्या नवीन निवासस्थानी पोहोचले. त्यांची पत्नी नक्षलवाद्यांशी हातमिळवणी करून संपूर्ण कुटुंबाला त्रास देत आहे.

    अवधेश लाल दास यांनी आरोप केला की केवळ त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून नक्षलवाद्यांनी संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली आणि पत्नीने त्यांना खोट्या प्रकरणात देखील अडकवले आहे. त्याचा एक लहान भाऊ असून तो परीक्षेची तयारी करतो आणि कधीच गावी जात नाही, त्यालाही या प्रकरणात जबरदस्तीने अडकवण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. न्

    यायाच्या अपेक्षेने मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठलेले अवधेश दास लाल सांगतात की, याआधीही त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयात दाद मागितली आहे, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.

    अवधेश लाल दास यांच्या संपूर्ण कुटुंबाची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. नितीशकुमारांना भेटून त्यांना व्यथा सांगायची होती. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेरच रोखले.